
World Cancer Day 2025: दरवर्षी संपूर्ण जगात ४ फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. जगभरात कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी, तसेच लोकांना कर्करोगाविषयी शिक्षित करण्यासाठी हा दिवस सजरा केला जातो.
कर्करोग हा आजच्या काळात मृत्यूचं मोठं कारण बनत आहे. हा आजार झपाट्याने वाढत असल्यामुळे जागतिक कर्करोग दिनाचे महत्त्व आणखीनच वाढते. या दिवसाचा उद्देश लोकांना कर्करोगाबद्दल जागरूक करणे आणि त्याच्या प्रतिबंध, उपचार आणि नियंत्रणासाठी प्रयत्न करायला प्रोत्साहित करणे हा आहे. चला, या दिवसाबद्दल अधिक जाणून घेऊया.