World Diabetes Day : जागतिक मधुमेह दिनानिमित्त मुलांच्या आरोग्याचा महत्त्वाचा संदेश; इन्सुलिन, आहार आणि साखरेची काळजी घेतानाच खेळ, शिक्षण आणि स्वप्नांनाही द्या प्राधान्य

World Diabetes Day Awareness and Diabetes Management in Children : मधुमेह असलेल्या मुलांना इन्सुलिन, आहार आणि रक्तातील साखरेची काळजी घेत सामान्य बालपण जगता आले पाहिजे. खेळ, मैत्री, शिक्षण आणि स्वप्नांना आजारामुळे मर्यादा येऊ नयेत.
World Diabetes Day

World Diabetes Day

Sakal
Updated on: 

मधुमेहाचे व्यवस्थापन आणि मुलाचे संगोपन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मधुमेहाचे व्यवस्थापन म्हणजे इन्सुलिन, आहार आणि रक्तातील साखरेची काळजी घेणे; तर संगोपन म्हणजे मुलाचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास घडवणे. मुलांना खेळायची, मैत्री करायची, शाळेच्या उपक्रमांत सहभागी होण्याची आणि स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळालीच पाहिजे. मधुमेह हा त्यांच्या आयुष्याचा फक्त एक भाग असावा; ती त्यांची ओळख नसावी.

Loading content, please wait...