World Environment Day 2025: पुढच्या पिढीसाठी आजच उचला हे पाऊल, पर्यावरणाच्या दृष्टीने अंगीकारा 5 सवयी ज्या ठेवतील वातावरण शुद्ध

5 Eco-Friendly Habits to Adopt on World Environment Day: पर्यावरण दिनानिमित्त आजपासून 5 शाश्वत सवयी अंगीकारा, जे ठेवतील हवामान शुद्ध.
World Environment Day | Sustainable Living | Eco-Friendly Habits
World Environment Day | Sustainable Living | Eco-Friendly Habitssakal
Updated on

Simple Changes to Reduce Pollution and Protect the Earth: दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुळ उद्देश पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती निर्माण करणे हा आहे. प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ठ थीम ठरवली जाते. यंदाची थीम “प्लास्टिक प्रदूषण हटवा” अशी आहे. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आपणच पुढाकार घेऊन पर्यावरण स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी काही सवयी अंगीकारल्या तर ते फायद्याचे ठरू शकते.

- ओला आणि सुका कचरा वेगळा करा

पर्यावरण रक्षणासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय आहे. घरातला ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाका. ओला कचरा (उदा. भाजीपाल्याचे काप, चहापत्ती वगैरे) खत म्हणून वापरता येतो. चहापत्ती स्वच्छ धुऊन झाडांच्या मुळाशी टाकल्यास ती खताचं काम करते आणि झाडांची वाढ चांगली होते. सुका कचरा पुनर्निर्मितीसाठी देऊ शकता.

- प्लास्टिकचा वापर कमी करा

प्लास्टिक प्रदूषण ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर हळूहळू कमी करा. याऐवजी सूती किंवा जूटच्या पिशव्या वापरा. या टिकाऊ असतात आणि पुन्हा पुन्हा वापरता येतात. शक्य असल्यास बायोडिग्रेडेबल पर्याय निवडा.

- पाण्याचा अपव्यय टाळा

विनाकारण पाणी वाहू देणे टाळा. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे लहानसहाम काळजी घेणे जसे की भांडी धुताना थेट नळाऐवजी एका पातेल्यात पाणी घेऊन मग भांडी घासा. टाकी ओव्हरफ्लो होऊ नये याची काळजी घ्या. पाणी ही अमूल्य संपत्ती आहे, त्याचा वापर विचारपूर्वक करा.

- शक्य तिथे सायकल वापरा

आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येक जण दुचाकी, चारचाकी किंवा स्कूटरचा वापर करतो. यामुळे होणारं प्रदूषण वाढतं. जर कुठे जवळपास जायचं असेल, तर शक्य असल्यास सायकल वापरा किंवा पायी जा. यामुळे प्रदूषण कमी होईल, आरोग्यही सुधारेल आणि निसर्गाचे रक्षणही होईल.

- वृक्षारोपण

पर्यावरण वाचवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शक्य तेवढी वृक्षारोपण. झाडे कार्बनडायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे हवा शुद्ध राहते आणि आपले आरोग्यही चांगले राहते. दर महिन्याला किमान दोन झाडे लावण्याचा संकल्प करा आणि आपल्या मित्र परिवार आणि नातेवाइकांनाही झाडे लावायला प्रोत्साहित करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com