
how to stay health: आजकाल खाण्याच्या वाईट सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे लोक आता निरोगी दिनचर्येकडे दुर्लक्ष करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात लोक आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर होत आहेत, त्यामुळे अनेक प्रकारचे आजार वाढत आहेत.
आजकाल लोकांना लहान वयातच बीपी, शुगर आणि थायरॉईड सारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैलीत बदल केले पाहिजे.
दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. लोकांना निरोगी आरोग्याबाबक जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तुम्ही सारखेच आजारी पडत असाल तर सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.