'आठवड्यात फक्त दोनदा होणारे दारूचे सेवनही यकृतासाठी ठरत आहे घातक'; तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती आणि दिला 'हा' सल्ला
World Liver Day : सध्या अल्कोहोलसोबत (Alcohol) धूम्रपान करणे हीदेखील फॅशन झाली आहे, पण दारूसोबत सिगारेट, तंबाखू, गुटखा, मावा हे तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यास याचा गंभीर परिणाम यकृतासह शरीरातील इतर अवयवांवरही होतात.
मुंबई : सोमवार ते गुरुवार या आठवड्याच्या पाच दिवशी जीव तोडून काम केल्यावर विकेंडला मौजमजेसाठी तरुण-तरुणी सध्या मोठ्या प्रमाणात मद्यपान (Liquor) करतात. आठवड्यात फक्त दोनदा होणारे दारूचे सेवनही यकृतासाठी घातक ठरत असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.