
world malaria day 2025 : सध्या देशाच्या अनेक भागांमधून मलेरियाचे रुग्ण आढळत आहेत. मलेरिया हा प्लास्मोडियम परजीवीमुळे होणारा डासांमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा परजीवी संक्रमित मादी अॅनोफिलीस डासाच्या चाव्याव्दारे मानवी शरीरात प्रवेश करतो. परजीवी प्रथम यकृतामध्ये वाढतात आणि नंतर रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि लाल रक्तपेशींना संक्रमित करतात.
मलेरिया झाल्यास त्याची लक्षण १०-१५ दिवसांनी दिसते. खुप ताप येणे, थंडी वाजून ताप येणे, घाम येणे, अशक्तपणा आणि उलट्या यासाराखी लक्षणे दिसतात. अशावेळी मलेरियापासून लवकर बरे होण्यासाठी संतुलित आणि योग्य आहार घेणे खूप महत्वाचे आहे.
आरोग्य तज्ञांच्या मते, योग्य आहार घेतल्यास शरीराची ऊर्जा वाढते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढून आजार दूर राहण्यास मदत मिळते. दरवर्षी जागतिक मलेरिया दिन २५ एप्रिल रोजी साजरा केला जातो. मलेरियाबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. मलेरिया झाल्यास आहार कसा असावा हे जाणून घेऊया.