

World Mental Health Day 2026
sakal
MENTAL HEALTH AWARENESS AND PSYCHIATRIC TREATMENT IN INDIA: सत्ताविशीतील राहुलला कामात मन न लागणे, भूक न लागणे, डोक्यात सतत विचार येणे हा त्रास वाटत होता. त्याने मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेतले. बरे वाटू लागले. मात्र, तज्ज्ञांनी दिलेल्या गोळ्या खाणे म्हणजे लोक काय म्हणतील या विचाराने उपचारच बंद केले. तर, रोहनलाही असाच त्रास व्हायचा.
कुटुंबीयांनी त्याला मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्यासाठी प्रोत्साहित केले. समुपदेशन आणि योग्य उपचारांमुळे हळूहळू त्याचा आत्मविश्वास आणि उत्साह परतला. या दोन्ही घटनांमधून मानसोपचार घेत असलेल्या व्यक्तीचा किंवा स्वतः रुग्णाचा सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित होतो.