
schizophrenia symptoms: पूर्वी स्किझोफ्रेनियासारखा मानसिक आजार झाल्यास बुवाबाजी, भोंदूंकडे घेऊन जाणे, असे प्रकार दिसायचे. मात्र, आता समाजात मानसिक आजारांबाबत जागृती वाढत असून, नागरिक सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत उपचारांसाठी जात आहेत. लवकर उपचार घेतल्यास नक्कीच आजार आटोक्यात राहू शकतो. रुग्ण सर्वसामान्य लोकांप्रमाणे आपले जीवन व्यतीत करू शकतो, अशी माहिती येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक रोहिणी भोसले-शेख यांनी दिली.