
मानवी शरीरातील नाजूक अवयव म्हणजे आपले डोळे. तेच डोळे व्यवस्थीत असतील तर आपल्याला कोणावर अवलंबून राहण्याची गरज नसते. पण, तेच डोळे जर गेले तर आपण शरीरानेच नाही तर मनानेही अपंग होतो. काही कारणाने अंध झालेल्या लोकांसाठी जागतिक दृष्टिहीन दिन साजरा केला जातो. आज जागतिक दृष्टी दिन आहे.
अंधत्वला आळा बसावा यासाठी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याची सुरुवात लाईन क्लब इंटरनॅशनल फाऊंडेशनने केली होती. या दिवशी ज्यांना दृष्टीसंबंधी समस्या आहेत त्यांना मदत करण्याचा, त्यांना प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न केला जातो. हा दिवस ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो.
यावर्षी हा दिवस आज (13 ऑक्टोबर) रोजी साजरा केला जात आहे. 1917 मध्ये मेल्विन जोन्सने लायन्स क्लब इंटरनॅशनलची स्थापना केली. या क्लबने चक्रीवादळाचा सामना करणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक कार्य केले. तसेच कर्णबधिर आणि कर्करोगाशी लढणाऱ्या लोकांसाठी विविध योजना राबवल्या आहेत.
काय आहे इतिहास
एका खासगी संघटनेने पहिल्यांदा या संदर्भात एक मोहीम राबवली होती. त्या माध्यमातून 8 ऑक्टोबर 1998 रोजी पहिल्यांदा जागतिक दृष्टी दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाईन्डनेस यांनी एकत्र येत ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं. जगभरातील लोकांमध्ये दृष्टीबद्दल जागरुकता निर्माण करणे तसेच ज्यांना अंधत्व असलेल्या लोकांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न करणे, असा उद्देश आहे.
1.99% भारतीयांना अंधत्व...
ऑल इंडीया इंस्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या नॅशनल ब्लाइंडनेस आणि व्हिजुअल इंपेयरमेंट सर्वेक्षण इंडिया 2015-19 नुसार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 1.99% भारतीयांना अंधत्व आले आहे तर संभाव्य दृष्टीहिनता असलेल्या लोकांची संख्याही चिंताजनक आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे याची कारणे सहसा माहीत नसतात. परिणामी मोठ्या संख्येने लोक कायमच्या अंधत्वाचे बळी ठरतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.