
पाली : जगभरात दरवर्षी 25 मे रोजी जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो. थायरॉईड संबंधित रोगांविषयी जनजागृती करणे, योग्य निदान आणि उपचार पद्धतींबद्दल माहिती पसरवणे हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) मते, जगभरात सुमारे 20 कोटी लोक थायरॉईडच्या विविध समस्यांग्रस्त आहेत, त्यापैकी अंदाजे 42 लाख भारतीय या आजाराशी झुंजत आहेत.