
benefits of Shalabhasana: योगासनाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम गुरू व इष्ट देवता यांना वंदन करावे. त्यांच्या कृपेने आणि प्रेरणेने शक्ती व बुद्धीची वाढ होऊन समाधान व सुखाच्या प्राप्तीबरोबरच रोग दूर होऊन निरोगत्वाचा लाभ होणार आहे, अशी मनाची पक्की धारणा ठेवावी. प्रार्थना मनःपूर्वक सावकाश दोन ओळीत एका श्वासाचे अंतर ठेवून म्हणावी. तसेच आसने करीत असताना
"कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।।
प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः ।।
हा मंत्र सतत मनात म्हणावा त्यामुळे एकाग्रता होऊन मन व बुद्धी शुद्ध होईल.