
Yoga Day 2025 Marathi wishes for family and friends: दरवर्षी 21 जून रोजी योग दिन साजरा केला जातो. लोकांना योग केल्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 21 जून हा दिवस योग दिन साजरा करण्यासाठी निवडण्यात आला, कारण तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस योगासाठी प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण तो आत्म-जागरूकता आणि आध्यात्मिक उर्जेचा काळ मानला जातो.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग करणे फायदेशीर असते. या दिवसानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. तसेच या दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी मराठीतून खास अंदाजात शुभेच्छा पाठवू शकतात.