Yoga Tips: 'या' मार्गांनी योगाला बनवा दैनंदिन जीवनाचा भाग, राहाल निरोगी

Yoga Tips: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे योगा करण्यासाठी वेळ मिळत नसेल तर पुढील टिप्स वापरून दैनंदिन जीवनात समावेश करू शकता.
Yoga Tips
Yoga Tips Sakal

yoga tips how to include yoga in your daily routine suryanamskar

आजच्या व्यस्त आणि धावपळीच्या जीवनशैलीचा सर्वात जास्त परिणाम लोकांच्या आरोग्यावर होतो. धावपळीच्या जीवनशैलीत लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही.

यामुळेच आजच्या काळात शारीरिक आणि मानसिक आजार वाढत आहे. हे टाळण्यासाठी व्यस्त जीवनशैलीमध्ये स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनात योगाचा समावेश करावा लागेल.

योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार दूर राहतात. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर पुढील काही योगांचा रोजच्या जीवनात समावेश करू शकता.

  • सूर्यनमस्कार

जर तुम्ही नियमितपणे सुर्यनमस्कार करत असाल तर अनेक आजार दूर राहतील. हा योग कमी वेळेत होतो. सूर्यनमस्काराचा 5 ते 10 मिनिटांचा सराव दीर्घ व्यायामापेक्षाही अधिक फायदेशीर ठरतो.

  • चालताना ध्यान करावे

ध्यान लावल्याने मानसिक आणि शारिरीक आजार दूर राहतात. या अवस्थेत तुम्ही चालणे सुरू ठेवू शकता आणि दैनंदिन कामे करू शकता. सध्याच्या स्थितीत राहून तुम्हाला फक्त तुमचे मन शांत आणि सतर्क ठेवावे लागेल.

Yoga Tips
Benefits Of Sukhasana : मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी फायदेशीर सुखासन, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे
  • कामाच्या दरम्यान योगा ब्रेक घ्या

तुमच्या कामाच्या व्यस्त शेड्युलमुळे तुमच्याकडे योगा क्लासला जाण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही कामाच्या दरम्यान योगा ब्रेक घेऊ शकता. घर किंवा ऑफिसचे काम करताना 10 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि त्या दरम्यान तुम्ही खुर्चीवर, डेस्कवर किंवा जमिनीवर बसून योगाभ्यास करू शकता. खुर्चीवर बसून हात आणि पायाचे व्यायाम करू शकता.

  • नियमितपणे सराव

कोणत्याही गोष्टीची सवय लावण्यासाठी त्याचा नियमित सराव करणे गरजेचे असते. सुरूवातीला कठीण योगासनांचा सराव करणे टाळा आणि साधी योगासने तुमच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा.

  • झोपण्यापुर्वी कोणते योगा करावे

दिवसाची सुरुवात करण्यासाठी सूर्यनमस्कार करावा आणि बेडवर झोपताना काही सोपे योगा करावे. उदाहरणार्थ, झोपण्यापूर्वी वज्रासनात बसावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि झोपही सुधारते. यासोबतच शवासन, बालासन केल्याने मेंदू शांत होण्यास आणि चांगली झोप येते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com