माझे वय २४ वर्षे आहे. मला सतत पित्ताचा व उष्णतेचा त्रास होतो. पोटात गरमपणा जाणवतो. घशात सूज आल्यासाखे वाटते व गिळताना त्रास होतो. यावर वैद्यांच्या सल्ल्याने कामदुधा व सूतशेखर घेते आहे. अजून काही उपाय करता येईल का?
- तनुश्री सोमण, पुणे
ज्याअर्थी पोटात गरमपणा व घशात सूज जाणवते आहे, त्याअर्थी पोटातील पित्ताचे संतुलन करणे आवश्यक आहे. वैद्यांच्या सल्ल्याने कामदुधा व सूतशखेर चालू ठेवू शकता. पण त्याचबरोबरीने संतुलन गुलकंद स्पेशल सकाळ-संध्याकाळ १-१ चमचा घेण्याचा उपयोग होऊ शकेल. तसेच पित्ताचे मुख्य स्थान असणाऱ्या यकृतावर काम करण्याच्या दृष्टीने संतुलनचे बिल्वसॅन रोज सकाळ-संध्याकाळी घेण्याचा उपयोग होऊ शकेल.
पोटाला रोज हलक्या हाताने संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल नक्की लावावे. साळीच्या लाह्या, साळीच्या लाह्यांचे पाणी, घरी बनविलेले साजूक तूप, भिजवलेल्या काळ्या मनुका, खडीसाखर यांचा आहारात समावेश असावा, तसेच चिंच वा लिंबाऐवजी कोकमाचा वापर करणे इष्ट राहील. रोज संतुलन शतानंत कल्प घालून दूध घेण्याचा फायदा होऊ शकेल. शक्य असल्यास एकदा शास्त्रोक्त विरेचन करवून घेणे उत्तम राहील.