esakal | Budget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास
sakal

बोलून बातमी शोधा

budget2021.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील.

Budget 2021: भाजप सरकारच्या काळात अर्थसंकल्पात आमूलाग्र बदल; जाणून घ्या इतिहास

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी, 2021 ला 2021-22 चे बजेट सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मांडल्या जाणाऱ्या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आपल्या बजेटच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा बदल करण्यात आला आहे. याबाबत घेतलेला एक आढावा.

ब्रीफकेस ते बहीखाता

अर्थमंत्री निर्मला सितारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील. यावेळचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा ठरणार आहे. याआधी अर्थसंकल्पामध्ये कातडी ब्रीफकेसमधून कागदपत्रे घेऊन जात. या परंपरेची सुरुवात देशाचे पहिले अर्थमंत्री आरके शणमुखम चेट्टी यांनी केली होती. निर्मला सितारमण यांनी 2019-20 मध्ये अर्थसंकल्पाची कागदपत्रे लाल रंगाच्या पारंपरिक बही खात्यातून आणली होती. त्यानंतर यंदा पेपरलेस बजेट सादर केलं जाणार असून त्यासाठी अॅप लाँच करण्यात आलं आहे. 

यूनियन बजेटचा काय आहे इतिहास? कशी असते संपूर्ण प्रक्रिया?

अर्थसंकल्प सादर कऱण्याची वेळ

सुरुवातीला अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या अखेरीस अधिवेशनाच्या शेवटी सायंकाळी पाचच्या सुमारास सादर केला जायचा. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलली आणि सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर कऱण्यास सुरुवात केली.  2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने ही पंरपरा मोडली. आता सकाळी 11 वाजता संसदेत बजेट सादर करण्याची परंपरा सुरु झाली. 

अर्थसंकल्पाची तारीख बदलली

2017 पर्यंत बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सादर केला जायचा. 2017 पासून तो 1 फेब्रुवारीपासून सादर केला जाऊ लागला.  तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची घोषणा केली होती.

रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प एकत्र

रेल्वे बजेट आणि यूनियन बजेट सुरुवातीला वेग-वेगळे सादर केले जायचे. 2017 पासून मोदी सरकारने रेल्वे बजेट आणि सर्वसाधरण बजेट एकत्र सादर करण्याचा प्रयोग केला. 2017 पासून दोन्ही बजेट एकत्र सादर करण्याची परंपरा सुरु झाली. भारताच्या अर्थसंकल्पाचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे रल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जात होता. मात्र तोसुद्धा 2016 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेडली यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट केला

Budget 2021: अर्थसंकल्पही झाला होता लिक; जाणून घ्या इतिहास

ॲपचे उदघाटन

अर्थमंत्र्यांनी हलवा समारंभातच युनियन बजेट मोबाईल ॲप या ॲपचेही उद्घाटन केले. यात अर्थसंकल्प (आर्थिक ताळेबंद), अनुदान विषयक मागण्या, वित्त विधेयक आणि इतर दस्तावेज बघता येतील. या ॲपवर हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये अर्थसंकल्प आणि अन्य दस्तावेज वाचण्याची तसेच करण्याचीही सोय असेल. हे ॲप अर्थसंकल्पाचे संकेत स्थळ (www.indiabudget.gov.in) यावरूनही डाऊनलोड करता येईल. अर्थमंत्र्यांचे भाषण झाल्यानंतर या ॲपवर  दस्तावेज मिळतील.

गोड पदार्थ खाऊन सुरुवात

प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाच्या छपाईआधी अर्थमंत्रालयामध्ये मोठ्या कढईत हलवा बनविला जातो. वर्षानूवर्षे ही पद्धत सुरू आहे. चांगल्या कामाला प्रारंभ म्हणून गोड पदार्थ खाऊन सुरुवात केली जाते. त्यामुळे हलवा बनविण्याची प्रथा आहे. महत्वाचे म्हणजे, नॉर्थब्लॉक येथे होणाऱ्या छपाईच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थसंकल्प सादर होईपर्यंत अर्थमंत्रालयातून बाहेर पडता येत नाही. 

loading image