Budget 2021: अर्थसंकल्पही झाला होता लिक; जाणून घ्या इतिहास

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 January 2021

कोरोनाच्या संकटानंतर देशाच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार कोणते दिलासादायक निर्णय घेणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. उद्योगजगतासह सामान्य नागरिकांसाठी समाधानकारक वाटेल असा अर्थसंकल्प सादर करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

Budget 2021 : कोरोनाच्या संकटानंतर देशाच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार कोणते दिलासादायक निर्णय घेणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. उद्योगजगतासह सामान्य नागरिकांसाठी समाधानकारक वाटेल असा अर्थसंकल्प सादर करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. कोरोना काळात जीडीपीमध्ये झालेली घसरण भरून काढून देशाची अर्थव्यवस्था गतीमान करण्याच्या दृष्टिने अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) कोणत्या घोषणा करणार हे पाहावे लागेल.

यूनियन बजेटचा काय आहे इतिहास? कशी असते संपूर्ण प्रक्रिया?

आगामी अर्थसंकल्पापूर्वी जाणून घेऊयात देशाच्या अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? आणि पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला यासारख्या अर्थसंकल्पासंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टींवर एक नजर 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थसंकल्पाचा इतिहास
- देशाचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 मध्ये सादर करण्यात आला होता.  
- ब्रिटिश सरकारमधील अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला होता.   
- स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 नोव्हंबर 1947 रोजी देशाचे पहिले केंद्रीय अर्थमंत्री आर के षणमुखम चेट्टी यांनी पहिला अर्थसंकल्प सादर केला. 
- अर्थसंकल्प पूर्वी राष्ट्रपती भवनामध्येच छापला जायचा. 
- 1950 मध्ये अर्थसंकल्प लीक झाल्यानंतर छपाईची जागा बदलण्यात आली.
- कधी काळी राष्ट्रपती भवन मध्ये छापला जाणारा अर्थसंकल्प आता सेक्युरिटी प्रेसमध्ये छापला जातो.  
- 1980 पासून अर्थसंकल्पाच्या छपाईचे काम हे अर्थ मंत्रालयाच्या प्रेसमध्ये केले जाते.  
- सुरुवातीच्या काळात अर्थसंकल्प हा केवळ इंग्रजी भाषेतच छापला जायचा.  
- 1955-56 पासून अर्थसंकल्प हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात येतो.

तुम्हाला बजेट समजत नाही? हा लेख वाचा!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: budget 2021 know about the history of indias budget