महिलांना कौटुंबिक सौख्य चांगले आहे असे दिसते. जोडीदाराशी संबंध मधुर राहतील. एकूणच महिना आनंदाचे डोही... असा असेल.
-निखिल शेंडूरकर
Aquarius Horoscope Kumbh Rashi 2025 : कुंभ ही बुद्धिवंतांची रास आहे. प्रत्येक बाब आपल्या तार्किक कसोटीवर घासून-पुसून घेतल्याशिवाय ही रास पुढे जात नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी इतरांना उत्सुकता असते. २०२५ मध्ये साडेसातीच्या अखरेच्या टप्प्यास सुरुवात होणार असल्यामुळे हा कालखंड काहीसा सौम्य असून लाभाचा असेल. त्यामुळे काहीही करा; पण विचाराची साथ ठेवूनच, असे धोरण ठेवा. नोकरी, व्यवसायामध्ये समाधानाचे पर्व सुरू होईल. मात्र, हितशत्रूंकडे दुर्लक्ष होऊ न देणे हितकारक. खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सर्व बाजू तपासून पाहा. महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांसाठी यशाचे तोरण बांधण्याची संधी लाभेल. फक्त वर्षभर त्यासाठी तयारी वाढवावी लागेल.