यंदा दूरचे प्रवास घडण्याचे योग आहेत. विशेषतः करिअर पुन्हा सुरू करण्याचा मानस असल्यास प्रयत्न करायला हरकत नाही.
-निखिल शेंडूरकर
Cancer Horoscope Kark Rashi 2025 : कर्क राशीच्या व्यक्ती स्वतःला त्रास करून घेतात; मात्र इतरांचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करतात. यंदाचे वर्ष नव्या संधी घेऊन येणार आहे; मात्र आपल्या चुकांमुळे त्या हातातून निसटून जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. यंदा दूरचे प्रवास घडण्याचे योग आहेत. विशेषतः करिअर पुन्हा सुरू करण्याचा मानस असल्यास प्रयत्न करायला हरकत नाही. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना (Students) यंदा मोठ्या संधी चालून येण्याचे योग दिसतात, तर महिलांमध्ये साहित्य-संगीतामध्ये विशेष रुची निर्माण होऊ शकतात. स्थावर खरेदीचा योगही प्रबळ आहे.