Capricorn zodiac sign 19 to 25 April
sakal
मकर राशीच्या व्यक्तींसाठी या आठवड्यातील शनी-मंगळ-बुध त्रिग्रहयोग काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. या योगाची ऊर्जा अतिशय विचित्र असल्याने तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा वैयक्तिक आयुष्यात त्याचे नकारात्मक चटके बसण्याची शक्यता आहे. विशेषतः हितशत्रू किंवा तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक गुप्तपणे त्रास देण्याचा प्रयत्न करतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी या काळात अधिक सावध राहणे गरजेचे आहे; किरकोळ कारणावरून प्रश्न चिघळू शकतात. अशा वेळी संयम हाच तुमचा सर्वात मोठा मंत्र असायला हवा. नात्यांमध्ये दुरावा येऊ नये म्हणून नातेवाइकांची मने जपण्याचा प्रयत्न करा.