
हा महिना आनंदाच्या बातम्यांनी भरलेला आहे. त्यामुळे आळस सोडून आपले काम पूर्ण करा. खूप दिवसांनी पुन्हा अशी संधी मिळणार आहे. नवे काम सुरू करण्यासाठी चांगला महिना आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू केल्यास फायदा होईल. नोकरदारांना बढतीची संधी मिळेल. तथापि, स्थान बदलू शकते. तब्येत सुधारेल. कौटुंबिक जीवन सुखकर होणार आहे. रोज श्री गणेश कवच स्तोत्र वाचावे.