Gemini zodiac sign
sakal
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी १० मे ते १६ मे २०२६ हा आठवडा बदल, सुधारणा आणि नव्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे. रवी-बुध युती आणि अमावस्येच्या प्रभावामुळे या आठवड्यात स्वतःच्या आरोग्याकडे आणि दैनंदिन सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मात्र सप्ताहाच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू अनुकूल होताना दिसेल. गुरुवारी राशीत होणारे शुक्राचे आगमन अनेकांना करिअर, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक संकेत देणार आहे.
या आठवड्यात 'थोडं थांबा, विचार करा आणि मग निर्णय घ्या' हा मंत्र मिथुन राशीसाठी महत्त्वाचा असेल. या कालावधीत अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.