मिथुन साप्ताहिक राशिभविष्य (१२ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६) : मानसिक चढ-उतारांमध्ये संतुलन साधा, शुभ क्षणांची साथ

Gemini zodiac sign

Gemini zodiac sign

sakal

Published on

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी १२ ते १८ एप्रिल हा आठवडा मानसिकदृष्ट्या थोडा अस्थिर राहू शकतो. विचित्र विचार, गुप्त चिंता किंवा अकारण तणाव मनाला त्रास देऊ शकतो. विशेषतः मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी या काळात मानसिक स्वास्थ्याची अधिक काळजी घ्यावी. नोकरीमध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींविषयी काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. सहकारी किंवा वरिष्ठांसोबत संवाद साधताना स्पष्टता ठेवा. चुकीच्या समजुतीमुळे तणाव वाढू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटी कामगारवर्गाशी संबंधित प्रश्न किंवा ताण जाणवू शकतो.

अमावस्येच्या प्रभावामुळे आरोग्याच्या मिथुन राशीच्या व्यक्तींना किरकोळ तक्रारी, वेदनायुक्त समस्या किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com