मेष
नोकरीत तुमचे प्रत्येक काम मनासारखे होईल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामात कार्यतत्पर राहाल. तुमच्या हातून कौतुकास पात्र काम घडेल. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. महिलांचा खर्च वाढला, तरी तो योग्य कारणासाठीच असेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
वृषभ
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल असल्याने व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पैशाची चिंता मिटेल. देणी देता आल्याने मनावरचा ताण दूर होईल. नोकरीत वरिष्ठांनी सोपवलेली कामगिरी यशस्वीपणे पार पाडाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. काहीतरी नवीन करून दाखवण्याची खुमखुमी येईल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.