मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र जाईल. वर्षभर प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
-निखिल शेंडूरकर
Aries Rashi Bhavishya 2025 : राशीमधील प्रारंभाची मेष रास (Aries Rashi). सध्या या राशीला साडेसाती सुरू आहे. त्यामुळे एकूणच वर्षभरात थोडे पुढे... थोडे मागे असा एकूण प्रवास राहील, असे दिसते. अडचणी आल्या तरी त्यावर मात करण्याची क्षमता या राशीच्या लोकांमध्ये असते. मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र जाईल. वर्षभर प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्थिक नियोजन पहिल्यापासूनच करण्याची आवश्यकता आहे. डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे.