अडचणी आल्या तरी त्या निभावून जाणार असल्याने उत्साह वाढेल, मात्र उत्साहाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेतल्यास संपूर्ण वर्ष सुखकर जाण्यास अडचण नाही.
-निखिल शेंडूरकर
Taurus Horoscope 2025 : वृषभ राशीसाठी यंदा एकूणच ग्रहयोग चांगले राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी शुभप्रद ठरू शकते. अडचणी आल्या तरी त्या निभावून जाणार असल्याने उत्साह वाढेल, मात्र उत्साहाचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेतल्यास संपूर्ण वर्ष सुखकर जाण्यास अडचण नाही. महिलांना (Women) वर्षभर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचेच दडपण असेल. दडपणाचा उपयोग अभ्यासासाठी केल्यास यशाचे द्वार उघडेल. संगत सातत्याने तपासून घ्यावी.