खग्रास चंद्रग्रहणामध्ये सूर्य आणि चंद्राच्यामध्ये पृथ्वी येईल. त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडेल. अशा स्थितीत दररोज स्वच्छ, पांढरा दिसणारा चंद्र ग्रहणकाळात लालसर होईल. याला रक्तचंद्र असेही म्हणतात.
गुहागर : खग्रास चंद्रग्रहण (Khagras Lunar Eclipse) शुक्रवारी (ता.१४) भारतात दिसणार नाही. हे ग्रहण मुख्यतः ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत, अटलांटिक, आर्कटिक महासागर, पूर्व आशिया आणि अंटार्क्टिका या भागांत दिसेल. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा (lunar Eclipse) कोणताही परिणाम भारतातील उत्सवांवर होणार नाही, अशी माहिती विविध पंचांगामध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे. कोकणात सध्या शिमगोत्सवाची (Shimogatsav) धामधूम सुरू आहे.