leo zodiac sign 19 to 25 April
sakal
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा संमिश्र फळांचा आहे. ग्रहांचा एकंदरीत पट पाहता, आर्थिक व्यवहारांत दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. सध्या बाजारात अनेक 'संमोहने' किंवा प्रलोभने तुम्हाला आकर्षित करू शकतात, परंतु कोणत्याही शॉर्टकटला बळी पडू नका. विशेषतः शेअर बाजारातील खेळ्या अत्यंत जपून कराव्यात; अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागू शकते.