नोकरीत कष्ट वाढणार आहेत. मात्र, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने तुमचे कष्ट सुसह्य होतील.
-निखिल शेंडूरकर
Libra Horoscope Tula Rashi 2025 : तूळ राशीच्या व्यक्ती मूलतः बॅलन्स ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. कोणत्याही बाबीचा चोहोबाजूंनी विचार करून पावले टाकण्याची वृत्ती असते. यंदाच्या वर्षातही त्यांना हा ‘बॅलन्स’ ढळणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. ग्रहमान (Planetary) पूर्ण बाजूनेही नाही आणि विरोधातही नाही अशी काहीशी स्थिती आहे. अशावेळी आपला कस लागणार आहे. नोकरीत कष्ट वाढणार आहेत. मात्र, सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याने तुमचे कष्ट सुसह्य होतील. पगारवाढ वा बढतीचे योग दिसतात. आरोग्याची काळजी घेणे हितावह. वादाचे प्रसंग उद्भवले तरी वाक्चातुर्याने त्यातून सुटका करून घ्याल. वर्षाच्या अखेरीस भरभराटीचा कालावधी दिलासा देईल.