Daily Horoscope 12th May 2024
Daily Horoscope 12th May 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 12 मे 2024

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुंवाद साधाल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. भाग्यकारक घटना घडेल.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होईल.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com