आजचे राशिभविष्य - 15 सप्टेंबर 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

आजचे राशिभविष्य - 15 सप्टेंबर 2022

मेष : तुमचे निर्णय योग्य ठरतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. मनोबल कमी राहील.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : मन आनंदी व आशावादी राहील. गुरूकृपा लाभेल.

कन्या : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

तुळ : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. वादविवाद टाळावेत.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन : व्यवसायात वाढ होईल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.