मीन साप्ताहिक राशिभविष्य (१२ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६) : नोकरीतील संकट होणार दूर; अमावस्येत अनपेक्षित लाभ

१२ ते १८ एप्रिल हा सप्ताह मीन राशीसाठी मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक पातळीवर परीक्षा घेणारा ठरू शकतो.
Pisces zodiac sign

Pisces zodiac sign

sakal

Published on

ग्रहमानाचा प्रभाव : तणावातून उभारी घेण्याचा काळ

१२ ते १८ एप्रिल हा सप्ताह मीन राशीसाठी मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक पातळीवर परीक्षा घेणारा ठरू शकतो. राशीतील शनी आणि मंगळ यांचा संयोग काही वेळा तणाव निर्माण करेल, तर काही वेळा तुम्हाला अधिक शिस्तबद्ध बनवेल. या काळात अचानक घडणाऱ्या घटना किंवा अनपेक्षित अडथळ्यांमुळे मन अस्थिर होऊ शकते. काहींना नैसर्गिक अडचणी किंवा बाह्य परिस्थितीमुळे त्रास जाणवू शकतो. मात्र या सर्वांमध्ये एक सकारात्मक बाजूही आहे. श्रद्धावंतांसाठी हा काळ दैवी पाठबळ देणारा ठरू शकतो.

पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आठवड्याच्या सुरुवातीलाच याची प्रचिती येईल. नोकरी किंवा व्यवसायात मदतीचा ओघ राहील, योग्य लोकांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे अडचणी असूनही मार्ग सापडत राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com