Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 04th february 2026 to 06th March 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
व्यवसायात बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. लवचिक धोरण ठेवलेत तर सर्वांशी सलोख्याचे संबंध राहतील. महिला खरेदी करतील. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. पाहुण्यांचे आनंदाने स्वागत कराल.