Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 09th May 2026 to 15th May 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. एखाद्या कामातील यशाचे स्वरूप लक्षात येईल. व्यवसायात पुढाकार घेऊन एखादी धाडसी कल्पना साकार करावीशी वाटेल. त्या कल्पनेला प्रतिष्ठित व्यक्ती व हितचिंतकांची साथही मिळेल. पैशाची चिंता दूर होईल. नोकरीत कोणाचीही मदत घेण्यापूर्वी त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. क्षमता ओळखून कामे स्वीकारा.