rashi bhavishya horoscope in marathi of this week 13th june 2026 to 19th june 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवावा. खर्चाचे प्रमाण वाढेल. अर्थप्राप्ती चांगली झाली, तरी पैशाची आवकजावक सारखी राहील. नवीन कामे मिळवताना दगदग, धावपळ करावी लागेल. कामात बेफिकीर राहून चालणार नाही. नोकरीत ‘शब्द हेच शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवून बोलावे. कुणाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नये.