Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 18th April 2026 to 24th April 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
चोखंदळ राहून कामे मिळवा. कामात सातत्य ठेवून नवीन कामांचे नियोजन करा. व्यवसायात जास्तीत जास्त चांगले काम करून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न राहील. केलेल्या प्रयत्नांचा लगेचच फायदा मिळेल ही अपेक्षा नको. उधारीपेक्षा रोखीवर भर देऊन कामे मिळवा. नोकरीत हातातील कामे वेळेत संपवा.