Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 19th july to 25th july 2025 all rashisakal
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १९ ते २५ जुलै २०२५ - मराठी राशी भविष्य
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात कार्यक्षमता वाढेल. कामाचा उरक दांडगा राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
- अनिता केळकर
मेष -
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. व्यवसायात कार्यक्षमता वाढेल. कामाचा उरक दांडगा राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची मर्जी राहील. जास्त सुविधा व सवलती मिळतील. नोकरदार महिलांना सहकाऱ्यांची मदत होईल. महिलांना गृहसौख्याचा अनुभव घेता येईल. वेळेचा सदुपयोग होईल.