Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 21st March 2026 to 27th March 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
व्यवसाय वृद्धिंगत करण्याकडे कल राहील, त्यासाठी दिवसाचे चोवीस तासही कमी पडतील. कामात भरपूर यश मिळेल. प्रगतीचा वेग उत्तम राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीत वेळेत कामे पूर्ण करण्याचा चंग बांधाल. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. परदेशगमन व परदेशव्यवहाराच्या कामांना गती मिळेल.