Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 26th july to 01st August 2025 all rashi
- अनिता केळकर
मेष -
सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्याने थोडे बुचकळ्यात पडाल. परंतु कामात चांगली कलाटणी मिळाल्याने तुमचा हुरूप वाढेल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. कामांना सुरुवात होईपर्यंत त्यात गुप्तता पाळा. पैशाचा अपव्यय टाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश येईल. हवी असलेली सवलत वरिष्ठ तुम्हाला देतील.