Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 28th february 2026 to 6th march 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
व्यवसायात कार्यतत्पर राहावे. महत्त्वपूर्ण घटना घडतील. खेळत्या भांडवलाची आवश्यकता भासेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. बरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. महिलांना मनाजोगता खर्च करता येईल.