weekly horoscope 24th march 2024 to 30th march 2024 pjp78
weekly horoscope 24th march 2024 to 30th march 2024 pjp78Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (२४ मार्च २०२४ ते ३० मार्च २०२४)

आम्रवृक्ष आणि त्याची पानं, फुलं आणि फळं यांचा वसंत ऋतूशी नातेसंबंध असल्यासारखाच आहे. जीवन हे एक बीज आहे, जीवन हा एक गर्भ आहे, आणि जीवन हे एक हातात पडणारं किंवा येणारं फळ आहे.

रोख रकमेची काळजी घ्या

मेष : आजचा रविवार वैयक्तिक उत्सव-समारंभ घडवेल. मात्र उद्याची पौर्णिमा प्रवासात बेरंग करू शकते. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी रोख पैसे जपावेत. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ ते २९ हे दिवस विवाहविषयक गाठीभेटींचे. वास्तुविषयक व्यवहार होतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याची पौर्णिमा गैरसमजातून कलह घडवणारी. शनिवारी वाहने सांभाळा.

कसलाही उन्माद टाळा

वृषभ : आजचा रविवार मृग नक्षत्राच्या व्यक्तींना अफलातून मौजमजेतून साजरा होईल. शिवाय ता. २९ चा गुड फ्रायडे मोठा संस्मरणीय ठरणार आहे. नोकरीत भाग्योदय होईल. कृत्तिका नक्षत्राच्या गृहिणींना उद्याची पौर्णिमा घरातील लहान मुलांना जपण्याची. रोहिणी नक्षत्राच्या तरुणांनी उद्याची धुळवड पर्यटनस्थळी जपून साजरी करावी. कोणताही उन्माद टाळा.

नोकरीत वरिष्ठांची कृपा होईल

मिथुन : आजचा रविवार वैयक्तिक उपक्रमांतून छानच बोलेल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह चांगलेच होळीचे रंग दाखवेल. नोकरीत वरिष्ठांच्या कृपेचा लाभ. ता. २७ ते २९ हे दिवस शुभ ग्रहांच्या झकास पॅकेजचे. तरुणांना जीवनातील मोठ्या संधी पुढे येतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी धूलिवंदनाजवळ वातावरणातील संसर्गापासून जपावे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना चोरी, नुकसानीचं भय.

कला व छंदातून प्रसिद्धी

कर्क : मंगळ भ्रमणाच्या पार्श्वभूमीवर होळी पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र दुखापतींपासून सांभाळायचं आहे. बाकी ता. २७ ते २९ हे दिवस जीवनात रंगतसंगत आणणारेच ठरतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील घडामोडींतून प्रसन्न ठेवतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार कला वा छंद माध्यमातून प्रसिद्धीचा. चैनीवर खर्च होईल. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींवर शनिवारची रंगपंचमी वैयक्तिक सुवार्तांतून रंग उधळेल.

परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय

सिंह : राशीच्या सप्तमस्थानातील शुक्रभ्रमण यंदाचा होलिकोत्सव छान साजरा करेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ ते २९ हे दिवस जीवनातील प्युअर सीक्वेन्स लावणारे. परदेशस्थ तरुणांचा भाग्योदय होईल. व्हिसाविषयक कामं होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी होळी पौर्णिमेजवळ प्रवासात चोरी वा नुकसानीपासून सावध. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रवासाच्या वेळा सांभाळाव्यात.

थट्टामस्करी टाळा

कन्या : होळी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र अनपेक्षित घटनांतून धावपळीचे ठरू शकते. घरात गर्भवतीची चिंता राहू शकते. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना ज्वरपीडेतून त्रास होऊ शकतो. सप्ताहात काहींना दंतव्यथा सतावेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी होळी पौर्णिमा आणि रंगपंचमीच्या प्रभावात थट्टामस्करी टाळावी. बाकी ता. २७ व २८ हे दिवस घरात सुवार्तांतून प्रसन्न ठेवतील. घरातील तरुणांचे विवाह ठरतील.

मोठ्या प्रसिद्धीची शक्यता

तूळ : होळी पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र मानवी उपद्रवातून त्रास देऊ शकतं. गैरसमज टाळा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी मित्रमंडळींशी जपून वागावं. बाकी स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २७ ते २९ हे दिवस जीवनात वसंतच फुलवणारे. पती वा पत्नीच्या मोठ्या शुभवार्ता कळतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मोठ्या प्रसिद्धी योगाचा. आजचा रविवार हरवाहरवीचा.

व्यवसायातील वसुली होईल

वृश्चिक : पौर्णिमेच्या सप्ताहातील शुक्र भ्रमण ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना चांगलेच प्रकाशात आणेल. आजचा रविवार याचीच प्रचिती देईल. सप्ताह वास्तुविषयक प्रश्न सोडवेल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना होळी पौर्णिमा व्यावसायिक वसुलीची. मात्र रंगपंचमीचा शनिवार वाहनांवर बेरंग करेल. वाहतुकीचे नियम पाळा. रस्त्यावर हुज्जती टाळा.

नोकरीत उत्तम घडामोडी

धनु : सप्ताहात बुध आणि शुक्र या ग्रहांचं एक रंगतदार फिल्ड राहील. ता. २७ ते २९ हे दिवस जीवनातील प्युअर सीक्वेन्स लावतील. प्रेमप्रकरणं फुलतील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्ष धन्यता देईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना रंगपंचमीचा दिवस दुखापतींतून बेरंग करू शकतो. बाकी सप्ताहात पौर्णिमेचे फिल्ड नोकरीत उत्तम घडामोडी घडवणारे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुयोग आहे.

वैवाहिक जीवनात रंगपंचमी

मकर : होळी पौर्णिमेचे फिल्ड संमिश्र फलदायी होऊ शकते. कोणताही जुगार नको. वाहने सांभाळा. बाकी ता. २७ ते २९ हे दिवस तरुणांना उत्तम संधी देतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना मित्रांकडून लाभ. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक पतप्रतिष्ठेचा लाभ. आई-वडिलांचा उत्कर्ष. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार व्यावसायिक लॉटरीचा. वैवाहिक जीवनात रंगपंचमी.

स्पर्धात्मक पातळीवर यश

कुंभ : आपल्या बाबतीत होळी पौर्णिमेचा एक व्हायरस राहील. मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक स्तरांवर पूर्ण पथ्ये पाळा. बाकी राशीचे शुक्र भ्रमण गुरूच्या प्रभावात ता. २७ ते २९ या दिवसांत पूर्वसंचित फळाला आणतील. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात या सप्ताहात परदेशी भाग्योदय होईल. काहींना स्पर्धात्मक यश मिळेल. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार सूर्योदयी मोठी सुवार्ता देईल.

जुनाट व्याधींचा त्रास शक्य

मीन : होळी पौर्णिमा संसर्गजन्य ठरू शकते. सप्ताह एखादी विचित्र मनोव्यथा देऊ शकते. एखादं संशयपिशाच सतावू शकते. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी जुनाट व्याधींचा उद्‍भव होऊ देऊ नये. अर्थातच दक्षता घ्यावी. बाकी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह घरातील प्रिय व्यक्तींच्या भाग्योदयांतून प्रसन्न ठेवेल. ता. २८ चा गुरुवार अतिशय भावरम्य राहील. शनिवारची रंगपंचमी पर्यटनाची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com