Dhanu Rashi Weekly Horoscope
Esakal
Dhanu Rashibhavishya: धनु राशीच्या व्यक्तींसाठी २ ते ८ ऑगस्ट २०२६ हा आठवडा संयम आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा ठरणार आहे. ग्रहमान तुमची परीक्षा घेईल; पण त्याच वेळी मेहनतीचे योग्य फळही मिळवून देईल. आठवड्याच्या सुरुवातीला शुभ ग्रहांची साथ असल्यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. घाईगडबड न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.
स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ आशादायक आहे. नव्या ग्राहकांशी संपर्क, जुन्या व्यवहारांची पूर्तता आणि प्रभावी संवादामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते. काहींना प्रभावशाली किंवा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. त्यामुळे अनेक कठीण वाटणारे प्रश्न सहज सुटतील. ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महत्त्वाचे निर्णय, मुलाखती, करार किंवा आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनुकूल वातावरण राहील.