वर्षाच्या प्रारंभी काहीसे कष्टाचे योग आहेत. मात्र, त्यानंतर प्रगतीची घोडदौड सुरू राहील, फक्त त्यावर संयमाचा लगाम लावता यायला हवा.
-निखिल शेंडूरकर
Scorpio Horoscope Vruchik Rashi Bhavishya 2025 : वृश्चिक राशीचा राशिस्वामी मंगळ आहे. त्यामुळे यांच्या स्वभामध्येच मूलभूत धाडस असते. यंदाच्या वर्षाचा विचार करता हे वर्ष बहुतांश किरकोळ बाबी वगळता सुखकर जाईल, असे दिसते. वर्षाच्या प्रारंभी काहीसे कष्टाचे योग आहेत. मात्र, त्यानंतर प्रगतीची घोडदौड सुरू राहील, फक्त त्यावर संयमाचा लगाम लावता यायला हवा. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळण्याचे योग आहेत. वाहन वा स्थावर घेण्यासाठीही अनुकूल कालावधी दिसतो. आवक होईल; पण खर्चाचे प्रमाणही वाढेल. परदेशी जाण्याचे योग आहेत. आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. विवाहासाठी अनुकूल काळ आहे. नियमित साधना ठेवावी.