Scorpio zodiac sign 29th march 2026 to 4th April 2026
sakal
२९ मार्च ते ४ एप्रिल या आठवड्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे हेच त्यांचे सर्वांत मोठे शस्त्र ठरणार आहे. पौर्णिमेच्या प्रभावामुळे मनात चढ-उतार जाणवू शकतात, पण अशा वेळी संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत भावनोद्रेक टाळणे महत्त्वाचे आहे. कारण क्षणिक प्रतिक्रिया दीर्घकालीन परिणाम देऊ शकते. विशेषतः सार्वजनिक जीवनात किंवा कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादात पडणे टाळा. प्रत्येकाशी संवाद साधताना समोरच्याची पातळी ओळखणे आणि त्याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे ठरेल.