Taurus Horoscope 2026
esakal
Taurus Horoscope 2026 : वृषभ राशीसाठी हे वर्ष संमिश्र आहे. वर्षभर शनी महाराज लाभामध्ये असल्यामुळे त्याची फळे चांगली मिळतील. कोणतेही काम करताना त्यामध्ये जरी अडथळे आले तरी ते नक्की मार्गी लागणार, याबाबत विश्वास ठेवा. जमीन किंवा घर खरेदीचा विचार असल्यास त्याला मूर्त रूप मिळू शकते; मात्र कोणताही व्यवहार काळजीपूर्वकच करावयाचा हे पक्के. लक्षात असू द्या.