Virgo zodiac sign
sakal
या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभग्रहांची साथ स्पष्टपणे जाणवेल. सुरुवातीलाच घरात आनंदाची बातमी—लग्नकार्ये ठरणे, गाठीभेटी वाढणे किंवा कुटुंबात उत्सवाचे वातावरण तयार होईल. घरातील तरुणवर्ग विशेष आनंदात राहील. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली एखादी गोष्ट आता प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. आठवडाभर उत्सव, समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांत तुमची उपस्थिती राहील.