vrishabha rashi bhavishya
Esakal
Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीसाठी २ ते ८ ऑगस्ट २०२६ हा आठवडा सकारात्मक घडामोडी, व्यावसायिक यश आणि वैयक्तिक आयुष्यातील समाधानाचा ठरणार आहे. शुभग्रहांचे पाठबळ असल्याने अनेक अडकलेली कामे मार्गी लागतील. विशेषतः व्यवसाय, मार्केटिंग, सामाजिक संबंध आणि विवाहविषयक प्रयत्नांना गती मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला संकष्टी चतुर्थीचा शुभ प्रभाव मानसिक शांतता देईल, तर शेवटचा टप्पा यशाची नोंद करणारा ठरेल.
या आठवड्यात नकारात्मक विचारांपेक्षा कृतीवर भर दिल्यास अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळू शकतो. जुने वाद किंवा विरोधकांचा प्रभाव कमी होईल आणि स्वतःचे स्थान अधिक मजबूत करण्याची संधी मिळेल.