

weekly horoscope 10th may 2026 to 16th may 2026
भागीदारीचे प्रश्न सुटतील
मेष : सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड कर्तृत्वाला वाव देणारेच राहील. शिस्तबद्ध वाटचालीतून फलद्रुप होणारेच ग्रहमान. सप्ताहारंभी रवी-बुध युतियोगाचे वर्चस्व राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या प्रकाशात येतील. ता. ११ व १२ हे दिवस झगमगाट करवतील. अगदी कडक उन्हाळ्यातही. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात घरी वा दारी क्रोध आवरावा. गैरसमज टाळावेत. बाकी अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहातील गुरुवार आणि शुक्रवार शुभग्रहांच्या साथसंगतीतून चमत्कार घडवतीलच. पती वा पत्नीची गुप्तचिंता जाईल. ओळखी-मध्यस्थीतून नोकरीच्या संधी टपकतील. सरकारी माध्यमांतून लाभ होतील. विशिष्ट व्यावसायिक येणे येईल. विशिष्ट भागीदारीचे प्रश्न सुटतील.