साप्ताहिक राशिभविष्य : (११ ऑक्टोबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६)

आपल्या संस्कृतीत सणवार हे ऋतूंच्या अनुषंगाने होणारी स्नेहसंमेलनेच म्हणावी लागतील. त्यातील नवरात्र हे विश्वाच्या व्यासपीठावरील होणाऱ्या स्नेहसंमेलनावर नक्षत्र लोकांतून होणारी पुष्पवृष्टी किंवा आनंद वर्षावच होय.
weekly horoscope 11th october 2026 to 17th october 2026

weekly horoscope 11th october 2026 to 17th october 2026

Sakal
Published on: 

सरकारी अनुदानातून लाभ होतील

मेष : सप्ताह शुभग्रहाच्या लॉबीतून फलद्रूप होणारा व्यावसायिक जाहिराती यशस्वी करतील. ता. १२ व १३ हे दिवस मोठी भाग्यबीजे पेरणारे, विशिष्ट व्यावसायिक भागीदारी यशस्वी ठरेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती मोठ्या सुवार्तातून लक्ष वेधूनच घेतील. व्यावसायिक विशिष्ट वसुली आर्थिक कोंडी घालवेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात कोणतेही जुगारसदृश व्यवहार टाळावेच, बाकी सप्ताह कलाकारांना मोठी ऊर्जा देईल. काहींना सरकारी अनुदानातून लाभ होतील. उद्याचा सोमवार विवाहेच्छुंच्या गाठीभेटी अंतिम टप्प्यात आणेल. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट घरातील प्रिय व्यक्तींच्या भाग्योदयातून भारावून टाकेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com