साप्ताहिक राशिभविष्य : (१२ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६)

माणसाच्या अहंकारजन्य सत्तासंघर्षातून माणसाचे तथाकथित महदाकाशातील अवकाश घरी आणि दारी शॉर्टसर्किटसारखे विस्फोटित होत असते.
weekly horoscope 12th april 2026 to 18th april 2026

weekly horoscope 12th april 2026 to 18th april 2026

Sakal
Published on

खेळाडूंनी दुखापतींपासून जपावे

मेष : सप्ताहातील शनी आणि मंगळ यांची स्थिती मोठी विरोधी राहू शकते. सार्वजनिक जीवनातील पथ्ये पाळाच. राजकीय व्यक्तींशी घरी आणि दारी क्रिया-प्रतिक्रिया जपा. बाकी सप्ताहातील गुरू-शुक्राची स्थिती तरुणांना साथ देईलच. मात्र खेळाडूंनी दुखापती सांभाळाव्या. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह महत्त्वाच्या गाठीभेटींतून सूर गवसून देईल. विशिष्ट वास्तुखरेदीतील अडथळे जातील. वैवाहिक जीवनातून प्रसन्नच राहाल. विशिष्ट उंची खरेदी करालच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात वेंधळेपणा टाळावा. घरातील लहान मुलांकडे लक्ष द्यावे. वाहनांवर सावध राहावे. गर्दीच्या ठिकाणी बेरंग होऊ शकतो. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येचे प्रभावक्षेत्र विचित्र गाठीभेटींतून बेरंग करणारे. नातेवाइकांशी अर्थातच भावाबहिणींशी गैरसमज किंवा वाद टाळा. व्यसनी व्यक्तींनी सप्ताहात भान ठेवावेच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com