साप्ताहिक राशिभविष्य : (१२ जुलै २०२६ ते १८ जुलै २०२६)

माणूस हे एक चिंतन आहे, तसेच माणूस हे एक दर्शनसुद्धा आहे आणि माणूस या दर्शनातून अंतरंगातूनही आनंद घेणारा सुद्धा आहे.
weekly horoscope 12th july 2026 to 18th july 2026

weekly horoscope 12th july 2026 to 18th july 2026

Sakal
Published on

थट्टामस्करी-टिंगल टाळाच

मेष : रवी-बुध युतीचा प्रभाव खेळाडू, कलावंतांना उत्तम फलदायी होईल. थोरामोठ्यांच्या गाठीभेटीतून भाग्यबीजे पेरली जातील. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींची जीवनविषयक दृष्टी बदलेल. सप्ताहाचा शेवट आत्मिक ऊर्जा वाढवेलच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींची गुरु-शुक्रांची विशिष्ट स्थिती सप्ताहातील शुक्रवार संध्याकाळी सार्थकी लावेल. विवाहविषयक गाठीभेटींतून सुसंवाद अर्थातच चमत्कार घडतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी सुरुवातीच्या अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात मानसिक संतुलन सांभाळावे. विचित्र थट्टामस्करी टाळाच. पैशाचे पाकीट जपा. घरातील लहान मुलांची काळजी घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com